जशी साय ग दूधाची
प्रेमाला तुझ्या आहे
गोडी ग मधाची
होई मन प्रसन्न
आठवी तुझी अंगाई
सुरवात जीवनाची
नि अंत तू ग आई
कोवळ्या स्पशाने ग तुझ्या
फुले कोमेजली कळी
सुख वाटे मला
असता तू जवळी
नसता तू समोर
हुरहुर वाटे मना
शोधत ग तुझ्या माझे
मन हिंडे वनावना
गोडी तुझ्या दुधाची
अम्रुतातही नाही
ओसंडूनि प्रेम तुझे
वाही दिशांत दाही
वात्सल्य सिन्धु ग तू
गोंड गाणी तुझ्या गळा
पडे अंगणात जसा
पारिजातकाचा सडा
कवि :- निवृत्ती पां .हागे