शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३

दलाली

इन्साफ कुणा मागू मी

सारेच जुलाली येथे 
अन कोर्ट कचेर्यांमध्ये
नेत्यांची दलाली येथे 

अजुनी सूर्याला माझे 
अर्घ्य अर्पण झाले 
उषेच्या गालावरती 
आली पण लाली येथे

पाठीवर माझ्या फिरले 
जे हात रेशमाचे 
त्या हातांच्या रेषांचा 
कोणी ना वाली येथे 

पोटात कुणाच्या दुखते 
मी श्वास घेतला कि 
चरती भिंतीवरती 
लाखो पाली येथे 

ज्या मध्ये माझे घरही 
हलकेच वाहुनी गेले 
तो पाऊस पडतो अजुनी 
साली दरसाली येथे 

कवी :- निवृत्ती पां . हागे 
दैनिक देशोन्नातीत प्रकाशित

राणी

सुगंध तुझा सखये
दरवळे रानोरानी
मी असा गुलाबी वारा
गातो तुझीच गाणी

केस तुझे भुरभुरती
माझ्या ग लयलाटीने
पण गुपित सांगता माझी
का होते अबोल वाणी

शरमेल हा मोगरा ही
मंद तुझ्या हसण्याने
मीच तुझा राजा अन
तू माझी ग राणी


कवी :- निवृत्ती पां . हागे

फेसबुक ची मजा

एकदा एका फोटोला
मी केली कमेंट
खतरनाक ठरला तो
माझ्यासाठी मोमेंट

फेसबुक वर झाली भेट
पोरगी पडली गळ्यात थेट
अर्ध्या रात्री उघडा नेट
तरी असते ऑनलाइन लेट

प्रोफाइल फोटो पाहून
अप्सरा आहे वाटलं
प्रत्यक्षात पाहिल्यावर
माझं काऴिजच फाटलं

फेसबुक वरच्या फेसांचा

फेस नाही खरा
ओळखिच्याचीच  फ्रेंड रिक्वेस्ट
एक्सेप्ट करा

सारी काही गफलत
या फेसबुकनं केली
चांगली माझी गर्लफ्रेंड
हातची गेली

नवीन नवीन लाइक्स
नवीन नवीन पोस्ट
कोणी करी पोक
तर कोणी बनवी होस्ट

नोटिफिकेशन्स येउन येउन

इनबॉक्स सारा भरला
शोधतो मग लाइक करायचा
कोणाचा फोटो उरला

नाही धकत भाकर
या फेसबुक विणा
हरएक पोरगी दिसते
इथे हसीना

फेसबुकच वेड आहे
भलकसं खराब
त्यापेक्षा पुरली
एक पेग शराब

तर ही असली
फेसबुकची मजा
बनवू नका तिला
स्वतःसाठी सजा 


कवी :- निवृत्ती पां . हागे 

महीला दीन

बस झाल देवा आता
स्त्री व्हायला पुरत नाही 
पदोपदी प्रतारणा
बाकी काही उरत नाही 

कीती अत्याचार आता 
मी येथे सहन करू 
खाऊ मार नवर्याचा की
बाकीच्यांचे पानी भरू 
कीती प्राणगेले तरी 
यांचे मन भरत नाही
पदोपदी प्रतारणा 
बाकी काही उरत नाही 

बस झाल देवा आता
स्त्री व्हायला पुरत नाही 
पदोपदी प्रतारणा
बाकी काही उरत नाही 

कवी :- निवृत्ती  पां . हागे 

किनारा


कोंडल्या श्वासांस वारा शोधतो मी
कांडल्या ध्यासांस थारा शोधतो मी

माळलेल्या त्या फुलांची आन मजला
पांगलेला गंध सारा शोधतो मी

पुरवली साड़ी जिला या केशवाने
त्या द्रौपदीला जागणारा शोधतो मी

मी तुझ्या आजन्म सहवासात यावे
तो परवलीचा किनारा शोधतो मी


कवि :- निवृत्ती पां. हागे
















शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

इच्छा एका आईची

मले एक सांग राज्या
कवा येइन रे रानी
लया जाइल अंगाची
सारी माया आनीबानी

मले लय काई नको
फ़क्त देजो एक खाट
ताट जेवायाले आनी
एक पाण्याचा रे माठ

नवं काई नाई फाटकं
लुगडच नेशिन
तोंड धुवायाले नाली दारी
नको तुझं बेशिन

आता काम होत नाइ
हड्ड्या सय्रा रे चुरल्या
कपयावर कुकवाच्या
रेषा तेवढ्या उरल्या

बंगला नको मले
झोपडिही चालीन
नेकलेस नाई लागत
एक कावी पोथ घालीन

फ़क्त देजो एक हाक
"माय " ह्मनुन रे मले
आसवांन होतात माये
डोये रोज ओले


कवि :- निवृत्ती पां . हागे

दैनिक देशोन्नातीत प्रकाशित