ज्यांनी ज्यांनी महिलांच्या
डोळ्यांत आणिल्या धारा
धरून त्यांना पटांगणी
चपला जोड्यांनी मारा
स्त्री हि अपुली संपत्ती
नि जपा तिला मानाने
तीच अहिल्या झाशीची
राणी जिजाऊ तारा
तिला मनी जपून आठवा
महती अपुल्या आईची
रक्त बनोनी दुध जिचे
वाहते याच शरीरा
बहिणीच्या रुपात कधी
येई राखी बांधाया
दादा म्हणुनी जन्म आपुला
नेई ती उद्धारा
जन्मभराची साथी बनते
पत्नी प्रत्येकाची
पातिव्रत्य निभावे जीवन
स्वर्ग करी संसारा
जपा दोस्तहो ! भान असू द्या
मान उरी तुमच्या
स्त्री शक्तीच्या महानतेचा
द्या सर्वांनी नारा
कवी : निवृत्ती पांडुरंग हागे
दैनिक देशोन्नातीत अंतरीचे बोल मध्ये प्रकाशित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा